पिंपरी दि.२३ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेवाडीतील प्रभाग क्रमांक २२ मधून महिला काँग्रेस शहराध्यक्षा सायली किरण नढे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. श्री गणरायाला वंदन करून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या हस्ते नारळ फोडून आणि परिचय पत्रक वाटप करून प्रचाराला सुरुवात झाली.
यावेळी मनोज कांबळे, बाबू नायर, निगाताई बारस्कर, तुकाराम भोंडवे, संदेश नवले, अभिमन्यू दहिदुले, कौस्तुभ नवले, ॲड. उमेश खंदारे, अर्जुन लांडगे, आशा भोसले, प्रियांका सगट, आबा खराडे तसेच नढे परिवारातील सर्व सदस्य आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून सायली नढे यांना उमेदवारी निश्चित असून, प्रचार शुभारंभाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
युवा नेतृत्वाची चमक असलेल्या सायली नढे यांना मतदारांनी प्रचारादरम्यान मोठ्या उत्साहाने संधी देण्याची अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांनी थेट आपल्या समस्या सांगताना त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी त्यांना प्रभागातील रखडलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यास त्या सक्षम असल्याचे सांगितले. समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करत राहण्याची त्यांची वृत्ती पाहता, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक चेहरा म्हणून सायली नढे यांची प्रतिमा अधिकच मजबूत झाली आहे.


