spot_img
spot_img
spot_img

अस्मिता खेलो इंडिया गर्ल्स किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये यशराज मार्शल आर्ट्सचा दणदणीत ठसा

१५ पदकांची कमाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

खेलो इंडिया अंतर्गत आयोजित ‘अस्मिता खेलो इंडिया गर्ल्स किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी विद्यालय, फुलगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत यशराज मार्शल आर्ट्स संस्थेच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत एकूण १५ पदके पटकावून संस्थेच्या यशात मानाचा तुरा खोवला.

या चॅम्पियनशिपमध्ये यशराज मार्शल आर्ट्सच्या रणरागिणींनी ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्य पदके जिंकत शिस्त, जिद्द आणि लढाऊ वृत्तीचे प्रभावी दर्शन घडवले. प्रत्येक लढतीत खेळाडूंनी दाखवलेली चिकाटी आणि आत्मविश्वास प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते.

सुवर्णपदक विजेत्या (Gold Medalists)

अनन्या वेताळ, श्रेया राठोड, कीर्ती जयकुमार, सुधा वैरागर

रौप्यपदक विजेत्या (Silver Medalists)

श्रावणी सिंग, अलैना खेर, योहानी मलिक, अंशिका सोनावणे

कांस्यपदक विजेत्या (Bronze Medalists)

सई राठोड, अर्निका काकडे, पूर्वा कुंभार, दिव्या चव्हाण, ब्लेसी भंडारी, अंकिता मंडल, गरिमा

झोनल लेव्हलसाठी निवड

स्पर्धेतील सर्व सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्या खेळाडूंची झोनल (विभागीय) स्तरासाठी निवड झाली असून ही स्पर्धा इंदूर येथे होणार आहे. कांस्यपदक विजेत्या खेळाडूंनाही पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला असून, ही केवळ सुरुवात असल्याचे प्रशिक्षकांनी नमूद केले.

“विजेते नशिबाने नव्हे, तर जिद्दीने घडतात” हे पुन्हा एकदा सिद्ध करत यशराज मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंनी राज्य व देशपातळीवर आपली ओळख भक्कम केली आहे. झोनल लेव्हलमध्येही अशाच यशाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!