जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण कामाचा लेखाजोखा सादर
शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्र. २३ मधून युवा नेते प्रशांत दिलीप सपकाळ हे महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहे, त्यांच्या वतीने प्रचार देखील सुरु करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 23 च्या सर्वांगीण विकासासाठी प्रशांत सपकाळ हे वचनबद्ध आहेत, त्यांनी आपल्या कार्य अहवालात अनेक विकासाचे मुद्दे मांडले आहेत
प्रभागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर कार्य अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालातून महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, आरोग्य, युवक सहभाग आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर करण्यात आलेल्या ठोस कामांचा आढावा मांडण्यात आला आहे.
थेरगाव परिसरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. अनेक सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील नागरिकांनी आपल्या मेहनतीच्या पैशाने या परिसरात घरे निर्माण केले आहे. प्राधिकरण समस्या येथे असल्याने येथील बांधकामांना अनधिकृत बांधकाम म्हणून संबोधित केले जाते. परंतु या सामान्य कुटुंबांची हक्काची घरे असल्याने प्रत्येक प्राधिकरण बाधित कुटुंबाला प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे प्रशांत दिलीप सपकाळ यांनी म्हटले आहे.
त्यांनी आपल्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृती आराखडा प्रसिद्ध केला आहे यामध्ये आगामी काळात अनेक विकास कामांचा धडाका त्यांच्या पुढाकाराने होणार आहे यामध्ये प्रामुख्याने त्यांनी मागील अनेक वर्षापासून केलेल्या सामाजिक कार्याचाही आढावा प्रसिद्ध करण्यात आला आहे
महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. महिलांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले, तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. रस्ते, ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. खड्डेमुक्त रस्ते, ड्रेनेज दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुधारण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्यात आला.
आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम राबवून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आले. युवक संघटन आणि सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी युवकांना एकत्र करून सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि सार्वजनिक कामांमध्ये सक्रिय सहभाग घडवून आणण्यात आला.
प्रशासनाशी थेट संवाद साधत नागरिकांच्या तक्रारी, समस्या आणि मागण्या संबंधित कार्यालयांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी विविध बैठका, संवाद कार्यक्रम आणि जनसंपर्क उपक्रम राबवण्यात आले.
असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड वाटप, तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य सुरक्षा कार्डचे वाटप करून गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना आरोग्यसेवांचा लाभ मिळवून देण्यात आला.
या कार्य अहवालातून “निवडणुकीपुरते नव्हे तर दररोज जनतेसाठी” या भूमिकेतून करण्यात आलेल्या कामांचा स्पष्ट संदेश मिळतो. येणाऱ्या काळातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा विकासाचा प्रवास अधिक गतीने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


