
शिवसेना (उबाठा) गटाचे माजी नगरसेवक यांचे नातू रोहन माने, जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पालके, उपाध्यक्ष ओंकार पवार ,कार्याध्यक्ष अमोल राठोड,ओंकार पात्रे,जय पवार, राहुल राठोड, अर्जुन पात्रे सोनू गवळी, दत्ता पालके, राहुल पात्रे,अभिजीत गवळी , विक्रम काळे, यश पात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपाचा झेंडा हाती घेतला. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्यायदेणारा पक्ष असून येणाऱ्या काळात सर्वांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच पक्षाची ताकद या कार्यकर्त्यांच्या मागे उभी करण्याचे काम करण्यात येईल असे मत तुषार हिंगे यांनी व्यक्त करत सर्वांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले.


