शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधून सौ. रूपालीताई पांडाभाऊ साने या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या प्रचाराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोनवणेवस्ती येथे झालेल्या प्रचार गाठीभेटींमध्ये महिलांशी थेट संवाद साधताना त्यांच्या अपेक्षा, चिंता आणि स्वप्नांचा खरा आवाज समोर आला.
या भेटीदरम्यान महिलांनी व्यक्त केलेल्या भावना केवळ शब्दांपुरत्या मर्यादित नसून, त्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या असल्याचं रूपालीताई साने यांनी सांगितलं. प्रत्येक आई, बहीण आणि लेकीकडून मिळालेली आपुलकी, प्रेम आणि विश्वास हीच आपल्या कार्याची खरी प्रेरणा असून, तो विश्वास जपणं हीच मोठी जबाबदारी असल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केलं.
महिलांची सुरक्षितता, सन्मान, आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन यासह कुटुंबाच्या प्रत्येक प्रश्नासाठी ठामपणे उभं राहणं हीच आपली खरी लढाई असल्याचं त्या म्हणाल्या. ही लढाई केवळ पदासाठी नसून, प्रत्येक महिला आणि कुटुंबाच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या संवादातून महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी आणि त्यांच्या स्वप्नांना आवाज देणारी नेतृत्वशैली दिसून येत असून, प्रभागात सौ. रूपालीताई पांडाभाऊ साने यांच्याविषयी विश्वास आणि अपेक्षा अधिक बळकट होत असल्याचं चित्र आहे.


