spot_img
spot_img
spot_img

एमआयटी-एडीटी विद्यापीठ आणि अपोलो यांच्यात सामंजस्य करार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आरोग्य शिक्षण आणि संशोधनामध्ये एक नवीन अध्याय सुरू करण्याच्या उद्देशाने, एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठ, अपोलो एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेड, चेन्नई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून या द्वारे एमआयटी-एडीटी विद्यापीठामध्ये प्रस्तावित ‘अलाईड हेल्थ’ (संलग्न आरोग्य विज्ञान) अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमधील सामंजस्य कराराव स्वाक्षरीच्या वेळी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि प्र-कुलपती प्रा.डॉ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., अपोलो एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसचे सीबीओ आशिष शर्मा, प्र-कुलगुरू मोहित दुबे (संशोधन आणि उद्योजकता), प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी (तंत्रज्ञान विभाग), कुलसचिव डॉ. महेश चोपडे, प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

एमआयटी-एडीटी विद्यापीठास ‘अ’ श्रेणीचे नॅक (नॅक) मानांकन मिळाल्यानंतर, आता तंत्रज्ञान शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर प्रगती करण्याची संधी विद्यापीठासमोर आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठासाठी आरोग्य शिक्षण आणि संशोधनाची नवीन दारे उघडली गेली असून विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेचा पूर्ण विकास करण्याच्या आणि त्यानतंर रोजगाराचा नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे आशावाद प्रा.डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे ‘अलाईड हेल्थ’ (संलग्न आरोग्य विज्ञान) क्षेत्रातील व्यावसायिकांची असलेली मोठी कमतरता भरून काढण्यास मदत होईल,असेही त्यांनी नमूद केले

कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी त्यांच्या प्रास्ताविकामधून उपरोक्त उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणाला चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी बोलताना, अपोलोचे सीबीओ आशिष शर्मा यांनी अपोलो समूहा बद्दल माहिती दिली.अपोलो समूह आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत असून अपोलो एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस द्वारे आरोग्य क्षेत्रातील जागतिक गरजा लक्षात घेऊन आपले अभ्यासक्रम तयार केले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाशी (एनईपी) सुसंगत असलेले आरोग्य विज्ञानातील पदवी (बी.एससी), पदव्युत्तर (ए.एससी) आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम या भागीदारीतून उपलब्ध होतील. तसेच, अपोलो कडे असलेला गेल्या ४० वर्षांचा आरोग्य क्षेत्रातील डेटा आणि सिम्युलेशन कोर्सेसचा फायदा विद्यार्थ्यांना संशोधनासाठी घेता येणार असल्याचे ते म्हणाले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!