spot_img
spot_img
spot_img

प्रभाग १८ मध्ये परिवर्तनाची नांदी – ज्योतीताई निंबाळकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला शहराध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर यांनी आपल्या प्रभावी प्रचाराने आघाडी घेतली आहे. आज विधीवत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करताच, मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड पाठिंबा दिसून आला.

निंबाळकर परिवारातील ज्येष्ठ तानाजी निंबाळकर आणि किशोर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक उत्साह, लोकसहभाग आणि परिवर्तनाची आस — या तिन्हींचा संगम या यात्रेत ठळकपणे दिसून आला.

यंदा प्रभाग क्रमांक १८ हा खऱ्या अर्थाने विकसनशील व्हावा, यासाठी मतदारांनीच परिवर्तनाची नांदी दिल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यमान लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याची भावना प्रभागात ठळक आहे. त्यामुळे या निवडणुकीत ज्योतीताई निंबाळकर यांनाच भरघोस मतदानाने विजय मिळेल, अशी ठाम धारणा मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.

चिंचवड गाव व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या विश्वासावरच ही निवडणूक लढविणार असल्याचे ज्योतीताई निंबाळकर यांनी स्पष्ट केले. विकास, पारदर्शकता आणि नागरिक-केंद्रित प्रशासन या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे प्रभाग १८ मध्ये परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास बळावत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!