शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांना भेटी देत अनिताताई संदीप काटे व संदीप विठ्ठल काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
सोसायटीतील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, वाहतूक कोंडी, सुरक्षितता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या व अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या. उपस्थित प्रत्येक मुद्दा मनापासून ऐकून घेत, नागरिकांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेण्यात आली.

यावेळी बोलताना सौ. अनिताताई काटे व संदीप काटे यांनी स्पष्ट केले की, येत्या काळात प्रभागातील सर्व समस्या ठोस, पारदर्शक आणि विकासाभिमुख पद्धतीने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू. “जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून सेवा आणि विकास हाच आमचा एकमेव ध्यास आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांशी थेट संवाद, प्रत्यक्ष भेटी आणि स्थानिक प्रश्नांची सखोल समज या माध्यमातून प्रभाग २८ मध्ये परिवर्तनाची सकारात्मक सुरुवात होत असल्याची भावना यावेळी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.



