शबनम न्यूज | पिंपरी
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने व आमदार मा. शंकरभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून भाजपा कायदा आघाडी संविधान विधी सेवा सल्ला मोफत केंद्राचे उद्घाटन दिनांक १३/०४/२०२५ रोजी सकाळी १० वाजता मा. नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भाजपा कायदा आघाडी अध्यक्ष अॅड. गोरक्षनाथ झोळ यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, अॅड. रोहित चिंचवडे, अॅड. बालाजी पवार, अॅड. वैशाली मुळीकर, अॅड. ओंकार देशपांडे भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, रवींद्र प्रभुणे, मधुकर बच्चे, शिवाजी राऊत, हरिभाऊ मोहिते, मंगलदास खैरनार, सुभाष पंडित, विजय अरक, मधुकर कुलकर्णी, उत्तम विटूले, सर्जेराव कोळी व इतर जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत संविधान विधी सेवा सल्ला मोफत केंद्र असणार आहे.