शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड : माजी नगरसेविका प्रियांका प्रवीण बारसे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक पाचमधील मतदारांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘मेलडी मेकर्स’ हा संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात हिंदी व मराठी चित्रपट गीतांची मेजवानी उपस्थितांना अनुभवता आली. कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांनी प्रियांका प्रवीण बारसे यांना पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या सभागृहात पाठविण्यासाठी भरघोस पाठिंबा देणार असल्याची ग्वाही दिली. नागरिकांशी संवाद साधताना प्रियांका बारसे यांनी आपल्या प्रभागात आरोग्य व शिक्षण या दोन अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक पाचमध्ये महानगरपालिकेची सुसज्ज डिजिटल शाळा उभारण्याचा संकल्प जाहीर केला. मागील कार्यकाळात शाळेसाठी प्रयत्न केले असले तरी काही तांत्रिक अडचणींमुळे काम अपूर्ण राहिले होते; मात्र आगामी काळात महापालिकेच्या माध्यमातून ही सुसज्ज शाळा उभारण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रभागातील विविध विकासकामे व विकासाचे मुद्दे घेऊन ही निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमातून कलाकारांनी सादर केलेल्या अनेक हिंदी–मराठी गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रियांका ताई बारसे यांनी सर्व उपस्थित नागरिकांचे आणि कलाकारांचे आभार मानले. एकूणच ‘मेलडी मेकर्स’ कार्यक्रमातून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आणि पाठिंबा दिसून आला.
“जिजाऊ क्लिनिकच्या कामासाठी नारळ फोडण्याची माझी इच्छा होती. सुदैवाने आज त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. मात्र सध्या आचारसंहिता लागू असल्याने मला स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहता येत नाही. तरीही नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू झालेले हे काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होईल, हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आणि अपेक्षा आहे. जनहिताची कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावीत, हीच माझी भूमिका आहे.”
— प्रियांका बारसे (माजी नगरसेविका)


