शबनम न्यूज
वाल्हेकरवाडी, चिंचवड वडिलांचे दुःखद निधन झाल्यामुळे शिक्षणात अडचणी येत असलेल्या, इयत्ता ११वीत शिक्षण घेत असलेल्या सेजल भोडे या विद्यार्थिनीला ओम प्रतिष्ठानच्या ‘विद्यादान योजने’अंतर्गत आर्थिक मदत करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. श्री. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते सेजल भोडे हिला धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी या उपक्रमामुळे घडत असलेल्या सामाजिक परिवर्तनाचे विशेष कौतुक केले. शिक्षणाच्या माध्यमातून मुली स्वावलंबी होत असून, त्या पुढे समाजातील इतर गरजू मुलींना मदतीचा हात देत आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. वनिता सावंत, योजनेच्या सचिव विद्या महाजन तसेच खजिनदार डॉ. सोनल पाटील उपस्थित होत्या.
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ओम प्रतिष्ठान ‘विद्यादान योजना’ या उपक्रमांतर्गत सातत्याने कार्यरत आहे.
समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि CSR विविध कंपन्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन मुलींना स्वावलंबी होण्यासाठी मदत करावी असे आवाहन श्री संजय कुलकर्णी सरानी यावेळी केले.
लाभार्थीनी श्रावणी दळवी हिने आभार मानले.


