शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक संपन्न होत असताना येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 32 प्रभागात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. अनेक उमेदवारांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 27 मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे माजी स्वीकृत सदस्य तथा पक्षाचे उपाध्यक्ष सागर खंडूशेठ कोकणे यांना मतदारांचा प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७, रहाटणी येथील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते तथा माजी स्वीकृत सदस्य सागर खंडूशेठ कोकणे यांनी नागरिकांना खुले पत्र लिहून आपली सामाजिक व राजकीय वाटचाल मांडली आहे.
पत्रामध्ये सागर कोकणे यांनी सांगितले की, २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांच्या वडिलांना महानगरपालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात रहाटणी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध पायाभूत सुविधा, रस्ते, पथदिवे, गटार व्यवस्था, उद्यान विकास यावर भर दिला. महापालिका अस्तित्वात आल्यानंतरही विकासापासून वंचित राहिलेल्या भागांसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
वडिलांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपणही सामाजिक कार्यात सक्रिय झालो असून, रहाटणी परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज आदी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच युवक उपाध्यक्ष म्हणून विविध आंदोलने, जाहिर सभा व मेळाव्यांचे आयोजन करून नागरिकांचे प्रश्न मांडले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २७ मधून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे संकेत देत, नागरिकांच्या पाठिंबा व शुभेच्छांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. “आपण दिलेला विश्वास आणि साथ कायम राहील,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे.
या पत्रामुळे प्रभाग क्रमांक २७ मध्ये निवडणूक वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून, स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.


