पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांकडून तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मधून शिवसेना पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटिका सौ. सरिता अरुण साने यांचे नाव एक सक्षम आणि ताकदीच्या उमेदवार म्हणून पुढे येत आहे.
सौ. सरिता साने यांनी यापूर्वी प्रभागातील तसेच शहरातील विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्या केवळ प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात एक कार्यक्षम नेतृत्त्व म्हणून ओळखल्या जात आहेत.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सौ. सरिता साने यांनी “सरिता साने सखी मंच”च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, तसेच स्वयंरोजगाराला चालना देणारे कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सौ. सरिता साने यांना प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत त्या एक प्रभावी आणि सक्षम उमेदवार ठरणार, असा विश्वास शिवसैनिक व स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.


