शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी : भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ११) साडेआठच्या सकाळी सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शिरगावजवळ घडली.
सचिन महेंद्र डेडिया (वय ४६) आणि परमेश्वर शिवलिंग व्हन्ड्राव (५७, रा. सराटी, केशेगाव, उस्मानाबाद) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रितेश लक्ष्मीचंद मामनिया (४१, रा. बोरिवली, मुंबई) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रवीणकुमार देवराम पंड्या (३९, रा. देवराम, बाडीगामा, बांसवाडा, राजस्थान) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावर वाहने थांबविण्यास प्रतिबंध असतानाही चालकाने रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा केला. तसेच कोणताही सिग्नल लावला नाही.