शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त तसेच बहुजन समाज पार्टी पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत कामगार नेते तथा बहुजन समाज पार्टीचे नेते सुंदर कांबळे यांच्या वतीने भव्य दिव्य अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये संविधान महिला मंडळाचे अध्यक्ष सौ अनिता सुंदर कांबळे यांच्या वतीने संविधान महिला मंडळाच्या 400 महिला सदस्यांना साडीवाटप करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्ताने अन्नदान वाटपही करण्यात येईल .तसेच बहुजन समाज पार्टीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यां चा सन्मान सोहळा या निमित्ताने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कामगार नेते सुंदर कांबळे यांनी दिली.
सुंदर कांबळे यांचे जनसंपर्क कार्यालय , लिंक रोड चिंचवड येथे हा कार्यक्रम संपन्न होत असून सदर कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्यावतीने बहुजन समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड व जिल्हा प्रभारी बंसी रोकडे तसेच आयोजक सुंदर कांबळे यांनी केले आहे.