spot_img
spot_img
spot_img

रावेतमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रावेत येथील स्वर्गीय बाजीराव बाबुराव विरंगुळा केंद्र येथे घोराडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघन काटे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग वाघिरे-पाटील आणि उद्योजक नंदकुमार भोंडवे तसेच संत तुकाराम साखर कारखाना कासरसाई चे संचालक मधुकर नथू भोंडवे यांचीही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

सोहळ्याची सुरूवात भजनी मंडळाच्या मंगलभजनांनी झाली. यानंतर प्रमुख अतिथींनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करत आनंदी, सुखी आणि समाधानकारक जीवनाचे महत्त्व विशद केले. समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्या अनुभवसंपन्न विचारांचा लाभ समाजाला मोलाचा असल्याचेही ते म्हणाले.

संघाचे संस्थापक सुरेश भाऊ भोंडवे, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर सचिव दीपक भोंडवे, शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, शिवसेना संघटक राजेंद्र तरस, फुले-शाहू-आंबेडकर मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, भाजपा रावेत–वाल्हेकरवाडी मंडळ अध्यक्ष मोहन राऊत आणि उपाध्यक्ष महेश साळुंके यांसह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

दीपक भोंडवे यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांना सुखी जीवनाचा मंत्र दिला. संघाच्या कार्यकारी मंडळाने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले असून सूत्रसंचालनाची धुरा देखील मंडळातील सदस्यांनी समर्थपणे सांभाळली.

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!