शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे-मुंबई महामार्गावर अचानक ब्रेक मारल्याने टेम्पोला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २७) रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास नाशिक फाटा, कासारवाडी येथे घडली. विशाल विजय चिंचपरकर (वय ३१) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. भवरसिंग सुमेरसिंग राजपूत (वय ३६, रा. भोसरी एमआयडीसी, मुळगाव राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.
काजल विशाल चिंचघरकर (वय २८, रा. सम्राट अशोक हाउसिंग सोसायटी, अकुंश चौक, निगडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री फिर्यादीचे पती विशाल चिंचपरकर हे दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात असलेल्या टेम्पोचालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागून येत असलेली दुचाकी टेम्पोला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विशाल चिंचपरकर यांचा मृत्यू झाला. दापोडी पोलीस तपास करत आहेत.








