शबनम न्यूज | प्रतिनिधी
एरंडवणे गणेशनगर भागातील पूरग्रस्त वसाहत भागात असणाऱ्या ऐतिहासिक व जागरूक मानल्या गेलेल्या श्री. शनि मंदिराचा जीर्णोद्धार व नुतनीकरणानिमित्य शनिवार दि. २९ नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत मंदिर परीसरात विवध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लघुरुद्र व अभिषेक, नगर प्रदक्षिणा, शनेश्वर याग, वास्तुशांती पूजन, कलश पूजन व महाप्रसाद, रामरक्षा व हनुमान चालीसा पठण, महा आरती व प्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण दिवसभर करण्यात आले होते. १००हुन अधिक महिलांनी पाण्याचे मंगल कलश डोक्यावर घेवून प्रातिनिधिक स्वरुपात नगरप्रदक्षणा पूर्ण केली. मंत्रघोषांनी सारे वातावरण चैतन्यमय झाले होते. संपूर्ण परिसर फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता.

१० चाळ, पूरग्रस्त वसाहत, गणेशनगर, एरंडवणे येथे संपन्न झालेल्या या धार्मिक महोत्सवाचे श्री. शनि मारुती बाल गणेश मंदिर ट्रस्ट यांनी संयोजन केले होते. संपूर्ण दिवसात १०हजार हून अधिक स्त्री-परुष भाविकांनी श्री शनि देवतेचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. याचे आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष दिपक केशवराव निकम यांनी केले होते. खासदार मेधा कुलकर्णी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, माजी उपमहापौर आबा बागुल, संदीप खर्डेकर, बाळासाहेब दाभेकर इत्यादींच्या हस्ते श्री शनि देवतेची विशेष आरती करण्यात आली. अशी माहिती संयोजक दीपक निकम यांनी दिली.








