पिंपळे सौदागर मध्ये परिवर्तन अकॅडमी सुरु…
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या युवकांसाठी परिवर्तन अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय खेळाडू मार्गदर्शक व राष्ट्रीय प्रशिक्षक सौरभ राजेंद्र कदम यांच्या पुढाकाराने परिवर्तन अकॅडमीचे उद्घाटन बाळासाहेब कुंजीर मैदान, पिंपळे सौदागर येथे नुकतेच संपन्न झाले.
सौरभ कदम यांच्या मार्गदर्शनात अनेक युवक घडले आहेत. अनेक युवकांना पोलीस भरती, पीएसआय प्रशिक्षण मार्गदशन लाभले आहे. युवकांच्या उज्वल भविष्यासाठी सौरभ कदम चिकाटीने काम करतात. त्यांच्या कार्याचे अनेक स्तरातून नेहमीच कौतुक होत असते, आता नुकत्याच त्यांच्या परिवर्तन अकॅडमीचे उदघाटन करण्यात आले, या परिवर्तन अकॅडमीच्या माध्यमातून युवकांना अनेक संधी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
परिवर्तन अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांना विविध प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. यामध्ये पोलीस भरती मैदान ट्रेनिंग, पीएसआय शारीरिक चाचणी पूर्वतयारी, ॲथलेटिक कोचिंग, शारीरिक शिक्षणाचे धडे, फिटनेस अँड वेट लॉस ट्रेनिंग, डाइट अँड न्यूट्रिशन गायडन्स तसेच करिअर मार्गदर्शन असे सर्व मार्गदर्शन सौरभ कदम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी परिवर्तन अकॅडमी संपर्क साधावा, असे आवाहन सौरभ कदम यांनी केले आहे.


