शबनम न्यूज | प्रतिनिधी
कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांनी
शोषित-पीडितांसाठी आयुष्य वाहणारे, शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी खुला करणारे आणि स्त्री-शिक्षणाची क्रांती घडवणारे महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते तर ते समतेच्या लढ्याचे खरे दीपस्तंभ देखील होते.त्यांचे विचार,त्यांची निर्भयता आणि मानवतावादी दृष्टिकोन आजही मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
याप्रसंगी डॉ.प्रशांत शिंदे,डॉ.विजय केसकर, डॉ.विलास बुवा,प्रा.ज्योत्स्ना गायकवाड,प्रा. विनायक शिंदे इ मान्यवर व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.








