spot_img
spot_img
spot_img

मतदान व मतमोजणी परिसरात १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्र ; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ दरम्यान शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार मतदान व मतमोजणीच्या ठिकाणापासून १०० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात मतदारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश बंदी असून मतदान केंद्रावर २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० पासून मतदान पूर्ण होईपर्यंत तर मतमोजणी केंद्रावर ०३ डिसेंबर रोजी सकाळी ६.०० वाजेपासून मतमोजणी संपेपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत.
प्रतिबंधित परिघात वाणिज्यिक आस्थापना, मंडपे, दुकाने, फेरीवाले तसेच मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक व विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना मात्र सूट देण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम व भारतीय न्याय संहिता-२०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!