शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या अनिता संदीप काटे यांच्या पुढाकाराने भव्य मोफतआरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या भव्य मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

चॅलेंज पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर येथे संपन्न झालेल्या या भव्य आरोग्य शिबिरात स्तनांचा कॅन्सर तपासणी ,रक्त तपासणी, रक्तातील साखर तपासणी, कोलेस्ट्रॉल तपासणी ,डोळ्यांची तपासणी असे विविध आजाराच्या तपासण्या करण्यात आल्या .26 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या शिबिरात प्रभाग क्रमांक 28 या परिसरातील अनेक नागरिकांनी, महिलांनी सहभाग घेऊन या शिबिराचा लाभ घेतला.
या आरोग्य शिबिराला पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी.
लावली.चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे व अनिता संदीप काटे यांच्या सहकार्याने सदर आरोग्य शिबिर संपन्न झाले.








