निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादीतील तारखांना मुदतवाढ
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी संदर्भातील सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे तांत्रिक कारणांमुळे पूर्वनिष्ठ तारखांमध्ये बदल करण्यात आला असून नवीन सुधारित वेळापत्रकानुसार विविध टप्प्यांच्या अंतिम तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत ही माहिती राज्य निवडणूक आयोगाने ई-मेल द्वारे सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर ऐवजी 3 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे तसेच हरकतीवरील निर्णय घेऊन अंतिम यादी प्रकाशित करण्याची तारीख पाच डिसेंबर ऐवजी 10 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे तर मतदान केंद्राच्या यादीची प्रसिद्धी 8 डिसेंबर ऐवजी 15 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली आहे केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी 12 डिसेंबर ऐवजी 22 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित होणार आहे
मतदार यादी तयार करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्वरित संपर्क साधण्यासाठी आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक व ई-मेल उपलब्ध करून दिले आहेत सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर हे उपलब्ध आहे असा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी काढला आहे.








