शबनम न्यूज | प्रतिनिधी
शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी एक वाजता माजी सैनिक वसाहत पौड रोड पुणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक माननीय यशवंत सहस्त्रबुद्धे हे होते तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक चंद्रकांत ओव्हाळ यांनी प्रास्ताविक केले. स्काॅमी ही संस्था गेले पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करते. अनाथ आश्रम, बालगृहे ,गरीब विद्यार्थी, महिला, तसेच कष्टातून वर आलेल्या मातांचा सन्मान करणे असे कार्य संस्थेने आजपर्यंत केले. कार्यक्रमानिमित्त काव्य संमेलन, आई वरील व्याख्यान , तसेच गझल गायन असे घेण्यात आले. अनेक मान्यवर कवी- कवयित्री यांनी सहभाग घेतला असून गझल गायक अशोक गायकवाड यांच्या सुश्राव्य मराठी गझलीने श्रोत्यांची मने जिंकून त्यांना अश्रू अनावर झाले.
तसेच माननीय शैलेश त्रिभुवन यांनी आई तुझ्यापुढे मी …
या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमात गौरी धुमाळ, मनीषा जोशी , सपना राठोड, जय श्री घनवट ,यांना आदर्श माता पुरस्कार तर माननीय आनंद तायडे शंकर काळंबे, सचिन सहस्रबुद्धे, अशोक गायकवाड, यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन मृण्मयी ओव्हाळ, स्वाक्षरी ओव्हाळ व राजेश चव्हाण यांनी केले.
सूत्रसंचालन स्वप्नात सहस्त्रबुद्धे यांनी करून आभार प्रदर्शन प्रियांका ओव्हाळ यांनी केले.








