शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय टपाल विभागातील पुणे शहर पूर्व विभाग शाखेचे द्विवार्षिक अधिवेशन दिनांक 23.11.2025 रोजी अत्यंत थाटात व उत्साहात देवकर बॅंकवेट हॉल,पिंपळे गुरव, पुणे 411061. याठिकाणी संपन्न झाले. सदर अधिवेशनामध्ये अनुक्रमे डी आर.देवकर,विनय खेडेकर,मयूर बोराडे हे पोस्टमन संघटनेचे तसेच रामदास वाकडकर,संतोष पवार,संजय ढवळे हे ग्रामीण डाक सेवक संघटनेमध्ये यांची अनुक्रमे सचिव,अध्यक्ष आणि खजिनदार म्हणून बिनविरोध निवड झाली.
सदर अधिवेशनास प्रमुख मार्गदर्शक म्हणून टी. एन. रहाटे साहेब मा.सेक्रेटरी जनरल न्यू दिल्ली, निसार मुजावर साहेब जनरल सेक्रेटरी न्यू दिल्ली, संतोष लाड साहेब,उपसचिव महाराष्ट्र व गोवा राज्य,श्री पी. एस. शिंदे, श्री असलकर साहेब ज्येष्ठ सल्लागार, दत्ता पाडळे,सर्कल उपाध्यक्ष, कुदळे, सचिव पुणे पश्चिम विभाग, रमाकांत शेलार व अन्य मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले व उपस्थित सभासदांना प्रोत्साहित केले.
यात आठवे वेतन आयोग, कर्मचाऱ्यांचे अधिकार, अन्याय, शॉर्टेज ऑफ स्टाफ या सर्व बाबींवर उहापोह झाला. अधिवेशनाचे अध्यक्ष पद श्री विनय खेडेकर यांनी उत्कृष्ट रित्या भूषवले. पुणे विभागातील न सुटलेल्या समस्यांबाबत सविस्तर माहिती, विभाग सचिव व रिजनल सचिव श्री देवदास देवकर यांनी इथंबूत अशी मांडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शितल नागवे मॅडम व सतीश जगताप यांनी सूत्रबद्ध रिता पार पाडले.
पुढील सन 2025 ते सन् 2027 सालाकरिता पोस्टमन व एम टी एस संवर्गासाठी खालील कार्यकारणी एकमताने निवड करण्यात आली.
अध्यक्ष – विनय खेडेकर
कार्याध्यक्ष – विजय बबन दांडेकर
उपाध्यक्ष – संजय रमेश आवळे.
उपाध्यक्ष – ईश्वर थोडीबा बुचडे
सेक्रेटरी – डी. आर देवकर
उपसेक्रेटरी – सतिश बाजीराव जगताप
सह सेक्रेटरी – कपिल मधुकर हणमंते
सह सेक्रेटरी – सतिश ज्ञानेश्वर खताळ
सह सेक्रेटरी – पंकज नारायण पोवार
सह सेक्रेटरी – तानाजी तुळशीराम मुळगे
खजिनदार – . मयूर भरत बोऱ्हाडे.
सह खजिनदार – सौ. शितल प्रल्हाद नागवे.
ऑर्ग. सेक्रेटरी – माधव मुजांजी झिलेवाड
ऑर्ग. सेक्रेटरी – संदीप सुरेंद्र परतेकी.
ऑर्ग. सेक्रेटरी -अक्षय भास्कर पगार.
अंतर्गत ही. त.- शुभम राजेंद्र मोर्य.
सल्लागार – निशार तडवी,
रमेश शेलार,
सह सचिव – नामदेव महादेव पाटील, गुलाल साहेबराव घूले,
अंकुश नथु पालवे.
प्रियंका दिलीप पाटील,
मेधा गोळे
पुढील सन 2025 ते सन् 2027 सालाकरिता ग्रामीण डाक सेवक संवर्गासाठी खालील कार्यकारणी एकमताने निवड करण्यात आली.
अध्यक्ष – संतोष पवार
कार्याध्यक्ष – विष्णू गायकवाड
उपाध्यक्ष – निकिता महाकाळ
उपाध्यक्ष – रमेश भोसले
सचिव – रामदास वाडकर
उपसचिव – मनोज राठोड
सह सचिव – शिवाजी खरपे
सह सचिव – अनुराग अगरवाल
सह सचिव – ज्योती म्हस्के
संघटक सचिव – बाबुसिंग चौहान
सह सचिव – अंकिता अळापुरे
सह सचिव – साक्षी कुंभार
खजिनदार – संजय ढवळे
सह खजिनदार – सौ श्रीलेखा नळे
अंतर्गत ही. त. – भाऊसाहेब इंगळे
सर्व नवीन निवड झालेल्या कार्यकारिणीला महाराष्ट्र व गोवा सर्कल संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या








