शबनम न्यूज | प्रतिनिधी
निगडी ते पिंपरी मेट्रो मार्गावरील धोकादायक चेंबर, खड्डे व धुलप्रदूषणा बाबत तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपरी ते निगडी पर्यंत महा मेट्रोचे काम सुरू असून निगडी पासून चिंचवड स्टेशन पर्यंत मुंबई पुणे महामार्गावर असणारे सिमेंट व लोखंडी जाळी असणारे चेंबर खूप धोकादायक झाले असून या चेंबरच्या चारही बाजूने अर्धा अर्धा फूट खड्डे झालेले आहेत. लोखंडी चेंबरच्या जाळ्या पूर्णपणे हलतायेत. या चेंबरवरून दुचाकी,तीन चाकी, चार चाकी वाहने जात असताना वाहन चालकाला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागतात. अनेक नागरिकांचे या रस्त्यावर अपघात होऊन हात मोडणे, पाय मोडणे, डोक्याला मार लागणे असे गंभीर प्रकार घडले आहेत. घडत आहेत.
तसेच महामेट्रोच्या कामामुळे प्रचंड धूळ या रस्त्याने असते. त्यामुळे अनेक नागरिकांना डोळ्याचे,शोषणाचे विकार होत आहेत.
या गंभीर विषयासंदर्भात यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे व आपल्याकडे आम्ही तक्रारी केल्या आहेत.मात्र आपण यावर कायमस्वरूपी दर्जेदार उपाययोजना केलेल्या नाहीत. आयुक्त शेखर सिंह यांची बदली झाल्यामुळे आता आपण महा मेट्रो बरोबरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून देखील कार्यरत आहात. आपण महापालिकेचा चार्ज घेतल्यानंतर आपण या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराल अशी आमची अपेक्षा होती.
मात्र आपण स्थायी समिती व महापालिका सभेत कोट्यावधी रुपयाचे मुदत वाढीचे, वाढीव खर्चाचे अर्थपूर्ण विषय मंजूर करण्यामध्ये मुशगल झाला आहात.
तरी मी आपणास या पत्राद्वारे विनंती करत आहे की या रस्त्यावरील सर्व धोकादायक चेंबर तातडीने दुरुस्त करावेत. तसेच रस्त्यावरील खड्डे तातडीने दुरुस्त करावे. धूळ प्रदूषणावर तातडीने योग्य त्या उपाययोजना राबव्यात. जर आठ दिवसात यावर तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर आम्हाला नाईलाजावस्तव आपल्या विरोधात आंदोलन करावी लागेल. याची सर्वस्व जबाबदारी आपली असेल कृपया याची नोंद घ्यावी, असा इशारा देखील मारुती भापकर यांनी दिला आहे.








