शबनम न्यूज | प्रतिनिधी
सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरुदेव हे तब्बल 68 दिवसांच्या महासाधने नंतर आपले दिव्य आशीर्वाद देण्यासाठी प्रथम पुण्यात येत आहेत. त्यांच्या सिद्धी साधनेच्या महाआशीर्वादाचा लाभ पुणेकरांना मिळावा यासाठी विश्व धर्म चेतना मंच,पुणे, पीसीएमसी परिवार यांच्या वतीने ‘सिद्धी साधनेचा महाआशीर्वाद’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा येत्या 29 नोव्हेंबर रोजी शनिवारी सायंकाळी 5 वाजता, वर्धमान सांस्कृतिक केंद्र, गंगाधाम, कोंढवा रोड, बिबवेवाडी, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती आयोजक उत्तम बाठिया व सुमित चंगेडिया यांनी दिली आहे.
यावेळी सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरूदेव यांचे व्याख्यान देखील होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोफत पासची व्यवस्था करण्यात आली असून ते कार्यक्रमस्थळी (स्वागत कक्ष येथे )दिले जाणार आहेत. या दिव्य सोहळ्याचा जास्तीत जास्त पुणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.








