spot_img
spot_img
spot_img

संविधान दिनानिमित्त आयोजित ‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ काव्य संमेलनाचा समारोप

‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ संमेलनात रोकडे दाम्पत्यास ‘क्रांतिसूर्य सावित्रीज्योति पुरस्कार’
‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ संमेलनात ‘संविधान सन्मान आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान
पुणे: “सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण, साहित्य आणि महिला सक्षमीकरणात अमुल्य योगदान आहे. सावित्रीबाई जोतिबांसाठी प्रेरणास्त्रोत होत्या. पती-पत्नीमध्ये एकत्व असणे आता खूप अवघड आहे. अशा काळात सावित्रीबाई आणि जोतिबा आपल्याला एकत्वाची प्रेरणा देतात. संविधानाची मूल्ये, फुले दाम्पत्याचे विचार प्रगल्भ समाजासाठी आवश्यक आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी केले.
विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समिती, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त आयोजित ‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ महाकाव्य संमेलनाच्या समारोपात डॉ. अश्विनी धोंगडे बोलत होत्या. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष संगीता झिंजुरके, स्वागताध्यक्ष सीमा गांधी, संयोजिका प्रा. भारती जाधव, पौर्णिमा वानखेडे, प्रा. सायली गोसावी आदी उपस्थित होते.
संमेलनात ‘क्रांतीसूर्य सावित्रीज्योति पुरस्कार’ बंधुता चळवळीत गेल्या ५१ वर्षांपासून योगदान देणाऱ्या मंदाकिनी आणि बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना, तर ‘ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ज्ञानसाधना पुरस्कार’ रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील कन्या महाविद्यालयास, तसेच ‘संविधान सन्मान आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ नम्रता फडणीस (लोकमत), सुवर्णा चव्हाण (पुढारी), कल्पना खरे-साठे (केसरी), मेधा पालकर (सामना), प्रीती पाठक (भास्कर), अर्चना मोरे (पुणे मिरर), चैत्राली देशमुख (सिव्हिक मिरर), शिवानी पांढरे (एबीपी माझा), गजाला सय्यद (शबनम न्यूज), वनिता चौधरी (साहित्यलीला पंढरी) यांना प्रदान करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने प्रा. सुप्रिया बनकर, प्रा. अनुप्रिया प्रभू, प्रा. सीमा ठोंगिरे, प्रा. पूजा जाधव, डॉ. माधुरी देशमुख, डॉ. मोनिका जैन, रोहिणी काकडे, सुषमा कारंडे, डॉ. वैशाली सुपेकर, प्रा. गौरी माळी, प्रा. सुवर्णा यादव व प्रा. पूजा चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, “बंधुतेचे कार्य आणखी नेटाने पुढे नेण्यासाठी रोकडे दाम्पत्याला हा पुरस्कार प्रेरणादायी ठरेल. फुले दांपत्याला खूप कष्टाचे आयुष्य मिळाले. पण ते त्याकाळी पुढारलेले कुटूंब होते. आपण सांगत असलेल्या संविधानाच्या मूल्यांचा उल्लेख फुलेंनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकात केलेला आहे. फुले केवळ समाजसुधारक नव्हते, तर कृतीशील लोकनेते होते. दोघांनीही साहित्याचा उपयोग समाज परिवर्तनासाठी केला.”

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!