अनेक वर्षाच्या सामाजिक कार्याच्या जोरावर लढविणार निवडणूक
पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरात थेरगाव परिसरात मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रवी रामदास भिलारे यांच्या सौभाग्यवती सौ. नम्रता रवी भिलारे यांनी थेरगाव मधील प्रभाग क्रमांक 23 च्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
सौ. नम्रता ताई भिलारे या आपले पती रवी रामदास भिलारे यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. थेरगावातील अनेक समस्या सोडविण्यासाठी सौ. नम्रता ताई भिलारे यांचा पुढाकार सर्वांनाच अवगत आहे.
आज पर्यंत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शैक्षणिक उपक्रम, महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण, असे अनेक समाज उपयोगी उपक्रम भिलारे कुटुंबीयांच्या वतीने राबविण्यात आले आहे. थेरगाव परिसरातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मनपा प्रशासनाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे व अनेक समस्यांचे निराकरण केले. याचबरोबर थेरगाव परिसरातील युवकांना योग्य दिशा व योग्य शिक्षण तसेच रोजगार उपलब्ध व्हावे. याकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन त्यांनी केले . आपल्या प्रभाग क्रमांक 23 चा विकास व्हावा याकरिता सौ. नम्रता ताई भिलारे यांनी मनपा प्रशासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामांना पूर्णतेकडे नेले आहे. स्वच्छता कामगार कचरावेचकांचे प्रश्न, या प्रभागातील रहदारीचा प्रश्न, पाणीपुरवठा, पथदिवे रस्ते, थेरगाव परिसरातील हॉस्पिटल आरोग्यसेवा या मुद्द्यांवर प्रभावीपणे कार्य केले.
सौ. नम्रता रवी भिलारे यांनी आपल्या पतीच्या समाजकार्यात मोलाचे योगदान दिले आहे. मागील अनेक वर्षापासून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे.
प्रभाग क्रमांक 23 च्या विकासासाठी आपल्याकडे अनेक विकासाचे मुद्दे आहेत. प्रभागाच्या विकासाचे व्हिजन आहे आणि हेच विकासाचे मुद्दे घेऊन आपण आगामी महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे नम्रता ताई यांनी सांगितले आहे.
त्या सध्या प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभागातील घराघरात मतदारांचा नम्रता ताईंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 चे प्रतिनिधित्व करण्यासाठी सौ नम्रता ताई रवी भिलारे यांनी आपली तयारी पूर्ण केली असून, थेरगाव अधिक सुरक्षित, सुसंस्कृत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.
अनेक वर्षापासून सामाजिक जीवनात कार्यरत असताना प्रभाग क्रमांक 23 मधील मतदारांशी नम्रता ताई भिलारे यांचे एक आपुलकीचे नाते तयार झाले आहे. आणि यावरूनच सौ. नम्रता ताई रवी भिलारे या एक सक्षम नेतृत्व म्हणून थेरगाव परिसरातून पुढे येत आहे. मतदारांचा आपल्याला नक्कीच पूर्णपणे पाठिंबा मिळेल व येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला मतदार नक्कीच संधी देतील असा त्यांना आत्मविश्वास आहे.









