शबनम न्यूज | प्रतिनिधी
हिंजवडीत अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. मारुंजी रस्त्यावर सिमेंट मिक्सरखाली चिरडून एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली.
गेल्या काही महिन्यांपासून हिंजवडी परिसरात डंपर आणि सिमेंट मिक्सरच्या धडकेत तरुणींच्या मृत्यूच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. आजच्या अपघातात रिदा खान हिचा मृत्यू झाला असून तिचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
रिदा खान ही मित्रांसोबत कासारसाई धरण परिसरात फिरून परत येत होती. दुचाकीवरून परत येत असताना शिंदे वस्ती येथे उतारावर भरधाव वेगाने येणाऱ्या सिमेंट मिक्सरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर दोघे रस्त्यावर पडले. त्यापैकी रिदा थेट सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा मित्र जखमी झाला आहे.या घटनेनंतर हिंजवडी आणि परिसरातील डंपर-सिमेंट मिक्सरमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित सिमेंट मिक्सरच्या चालकाचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.








