spot_img
spot_img
spot_img

“भाजपचा युद्धघोष: पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्या शक्तिसंचय!”

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपने शहरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी लढाईत पुन्हा स्वबळावर सत्ता मिळवण्याचा निर्धार करत उद्या (शनिवारी) सकाळी १० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात शहरातील अनेक प्रभावशाली नेते आणि इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात होणारे प्रवेश यामुळे भाजप आपली राजकीय ताकद स्पष्टपणे दाखवण्याच्या तयारीत आहे.

या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे हे विशेषतः मार्गदर्शन करणार असून, पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा जिंकण्यासाठीचा ‘ब्लूप्रिंट’ या ठिकाणी मांडला जाणार आहे.
तसेच आ.महेश लांडगे,आ. शंकर जगताप, आ.उमा खापरे, आ. अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप आणि इतर वरिष्ठ नेते या मेळाव्यात एकत्रितपणे शहरातील वातावरण तापवण्याची भूमिका घेणार आहेत.
“आपापल्या टीमसह मोठ्या संख्येने या,” असा स्पष्ट संदेश शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दिला आहे.

येत्या काळातील प्रचाराचा सूर कसा असावा, विरोधकांना कशा पद्धतीने राजकीय उत्तर द्यायचे, कोणत्या रणनीतीने शहरात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करायचे—या सर्व मुद्द्यांवर उद्या रविंद्र चव्हाण थेट मार्गदर्शन करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेनेच्या दोन गटांतून भाजपमध्ये प्रवेशाचे हालचाली सुरू असल्याने शहरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. “जिंकणाऱ्यांच्या बाजूला उभे राहावे” हा संदेश अनेकांना समजला असल्याने भाजपकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे सूत्रांकडून स्पष्ट होत आहे.

अलीकडे ठाणे-कल्याण महापालिकेत शहरातील दिग्गजांना प्रवेश देत भाजपने मोठा राजकीय टप्पा साधला. त्या धर्तीवरच पिंपरी चिंचवडमध्येही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांना प्रवेश देऊन थेट आव्हान उभे करण्याची भाजपा तयार असल्याचे राजकीय चर्चेत वेगाने पसरत आहे.

या पार्श्वभूमीवर उद्याचा मेळावा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, पिंपरी चिंचवडमधील आगामी महापालिका निवडणुकीचा राजकीय बिगुल मानला जात आहे.

भाजपचे शहरातील कार्यकर्ते, इच्छुक, पदाधिकारी यांच्यात प्रचंड उत्सुकता असून—“पुढील निवडणूक म्हणजे सत्ता पुनर्जिंकण्याची निर्णायक लढाई”—असा सूर पक्षात उमटत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!