spot_img
spot_img
spot_img

प्रभाग क्रमांक 23 मधून सुशिक्षित उमेदवार, सौ.सोनाली संदीप गाडे निवडणूक लढविण्यास इच्छुक

प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. प्रत्येक प्रभागात अनेक राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून सौ. सोनाली संदीप गाडे या महापालिका निवडणूक लढविण्यास तयारी करत आहेत. मतदारांचा असणारा सकारात्मक प्रतिसाद व मतदारांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आग्रह होत असल्याने सौ.सोनाली संदीप गाडे या निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सुशिक्षित, सक्षम, नेतृत्व गुणसंपन्न , प्रभागातील समस्या त्वरित सोडवण्यासाठी असणारी धडपड यामुळे संपूर्ण प्रभागात सोनाली ताई या परिचित आहेत.

सोनाली संदीप गाडे यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले आहे. त्यांचे पती स्वीकृत सदस्य म्हणून मागील अनेक वर्षापासून प्रभागात कार्यरत आहेत. संदीप गाडे यांच्या खांद्याला खांदा लावून सोनाली ताई गाडे यांनी प्रभागातील अनेक समस्या सोडविण्यावर भर दिला आहे.

प्रभाग क्रमांक 23 मध्ये संदीप गाडे व सोनाली गाडे यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, सत्कार तसेच महिला व बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम महिलांना रोजगार मिळावा, याकरिता अनेक शासकीय योजना प्रभागात राबविल्या गेल्या आहेत.

महिला बचत गटांच्या माध्यमातून सौ. सोनाली संदीप गाडे यांनी महिलांचे संघटन केले आहे. असे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवून सौ सोनाली संदीप गाडे यांनी प्रभाग क्रमांक 23 मधील संख्या मतदारांच्या मनात आदराचे स्थान मिळविले आहे.

सौ. सोनाली संदीप गाडे या भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 23 मधील महिला अध्यक्ष तथा रोटरी क्लब थेरगावच्या संचालिका आहेत. थेरगाव परिसरात महिलांचे एक सक्षम नेतृत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. प्रभागातील महिलांच्या अडीअडचणीला त्या स्वतः धावून जातात, तसेच सर्वांच्या सुखदुःखात सामील होणे, त्यामुळे थेरगाव परिसरात अनेक कुटुंबांशी त्यांचे आपुलकीचे नाते जोडले गेले आहे. मागील अनेक वर्षे त्यांचे पती माजी स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांच्याबरोबर त्या राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहेत. विशेष करून महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा, त्यांना एक संधी प्राप्त व्हावी यासाठी दरवर्षी त्या वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतात. या मध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, आरी वर्क क्लासेस तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ,पतंग फेस्टिवल, आरोग्य शिबिर ,डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असे अनेक आरोग्य शिबिरे याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड व विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना असे अनेक योजना त्यांनी प्रभागात राबविल्या आहेत. समाजकार्याची आवड असल्यामुळे जागतिक लेव्हलची रोटरी क्लब संस्था थेरगाव मध्ये स्थापन करणे व रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजकार्य करत राहणे याचबरोबर रोटी क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविणे यामुळे सौ. सोनाली गाडे या एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून नावारूपाला आल्या आहे. प्रभाग क्रमांक 23 मध्ये त्यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा आहे. व या पाठिंबाच्या जोरावरच तसेच समाजकार्याच्या जोरावर त्या आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. नक्कीच मतदारांच्या पाठिंब्यावर त्यांना या निवडणुकीत यश मिळेल असे जाणकारांचे मत आहे.

प्रभाग क्रमांक 23 मधून एक सुशिक्षित चेहरा महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवायचाच, असा ठाम निर्धार प्रभागातील मतदारांनी केला असल्याने सोनाली संदीप गाडे या आगामी काळात नक्कीच महानगरपालिकेच्या सभागृहात दिसतील यात शंका नाही.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!