शबनम न्यूज | प्रतिनिधी
कंपनीने घालून दिलेल्या गोपनीयतेच्या अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील एका कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्याने कंपनीच्या विदाची (डेटा) चोरी केली. हा प्रकार बारणे येथे उघडकीस आला.
याप्रकरणी कंपनीच्या अधिकारी महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बावधन परिसरातील एका कंपनीत काम करत होता. कंपनीने त्याला अधिकृत ई-मेल आयडी दिला आहे. त्या ईमेल आयडी वरील माहिती त्याने स्वतःच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर पाठवली.तसेच काही माहिती त्याने त्याच्या भावाला ई-मेलद्वारे पाठवली. कंपनीच्या डिझाइन्स आणि ड्रॉइंगचा विदाची चोरी केला. कंपनीच्या गोपनीयतेच्या अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.


