शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यातील आगाखान पॅलेसच्या आवारातून चंदनाच्या झाडाची चोरी केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. पॅलेसच्या आवारातून चंदनाची झाड कापून नेण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पॅलेस मधील उद्यान सहाय्यक ओंकार गरुड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
येरवडा भागातील आगाखान पॅलेस च्या आवारात कस्तुरबा गांधी खादी ग्रामोद्योग विद्यालय आहे. मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटे आगाखान पॅलेसच्या आवारात शिरले, त्यांनी कस्तुरबा गांधी खादी ग्रामोद्योग विद्यालयाच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले. चंदनाच्या झाडाचा बुंधा करवतीने कापण्यात आला. झाड चोरून चोरटे पसार झाले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.








