spot_img
spot_img
spot_img

किरकोळ कारणावरून महिलेचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कचरापेटीत दिले फेकून..

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुण्यातील येरवडा परिसरात महिलांना दांडक्याने बेदम मारहाण करून तिचा दोघांनी मिळून खून केल्याची घटना घडली. आरोपींनी मृतदेह दोन ते तीन दिवस घरात ठेवून दुर्गंधी सुटल्यानंतर कचरापेटी टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुवर्णा (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर रवी रमेश साबळे (वय ३५) त्याचे वडील रमेश रामचंद्र साबळे (वय ६५, दोघेही रा. जिजामाता नगर, नवी खडकी, येरवडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी साबळे याची सुवर्णा नावाच्या महिलेची काही दिवसांपूर्वी पुणे स्टेशन परिसरात ओळख झाली होती. १५ नोव्हेंबर रोजी तिला पुणे स्टेशन परिसरातून त्याने येरवडातील घरी आणले, किरकोळ कारणावरून रवीचा तिच्याशी वाद झाला. त्यानंतर रवी आणि त्याचे वडील रमेश यांनी तिला घरात लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत ती गंभीर जखमी झाली, गंभीर जखमी झालेल्या सुवर्णाला दोघांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले नाही. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर दोघांनी दोन ते तीन दिवस मृतदेह घरात ठेवला. मृतदेह घरात ठेवल्यानंतर दुर्गंधी सुटली. आरोपींनी तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून रिक्षातून लोहगाव-वाघोली रस्त्यावरील स्मशानभूमी परिसरात नेला. त्यानंतर या भागातील मोकळ्या जागेतील कचरापेटीत तिचा मृतदेह आरोपींनी टाकला.

मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी लोहगाव-वाघोली रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आरोपी रवी साबळे आणि त्याचे वडील रमेश यांनी सुवर्णाचा किरकोळ वादातून बेदम मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली. याबाबत अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!