spot_img
spot_img
spot_img

शाहू नगरमध्ये रंगला सौभाग्य, संस्कार आणि आनंदाचा अनोखा संगम!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात सौभाग्य, संस्कार आणि आनंद यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. आमदार अमित गोरखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्रीमती अनुराधाताई गोरखे आणि हम पाच ग्रुप यांच्या संयोजनातून हा भव्य कार्यक्रम राजश्री शाहू क्रीडांगण, शाहूनगर, चिंचवड येथे काल उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी के कोकाटे आणि प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांनी केले या कार्यक्रमाला 4000 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला व शेकडो महिलांनी बक्षिसे जिंकली.

शाहू नगर, संभाजी नगर, दत्तनगर, मोरवाडी,म्हाडा विद्यानगर व आसपासच्या परिसरातील माता-भगिनींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. घर सांभाळणाऱ्या, समाज घडविणाऱ्या आणि आपल्या प्रत्येक क्षणात प्रेमाची उब देणाऱ्या गृहिणींसाठी खास आयोजित केलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी महिलांनी आपली कल्पकता, उत्साह आणि कौशल्यांचे सुंदर दर्शन घडवले. हास्य, स्पर्धा आणि आनंदाचा जल्लोष अनुभवत अनेकांनी आकर्षक बक्षिसेही जिंकली. या कार्यक्रमात पहिल्या विजेत्यांना सोन्याचा हार देण्यात आला, तर तीन विजेत्यांना ई-व्हेईकल, टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, पैठणी यांसारखी शेकडो बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. महिलांच्या हातात घर, समाज आणि संस्कार आहे, आणि आज त्या हातांनी आनंदाचा उत्सव रंगवला हे या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवले.

या प्रसंगी आमदार सौ. उमाताई खापरे, सुप्रिया चांदगुडे, सोनाली हिंगे, दीपाली करंजकर, रोहिणी रासकर, मा नगरसेविका शर्मिला बाबर, मा नगरसेविका कमल घोलप, रेश्मा बाबर, प्रतिभा जेउरकर, प्रतिभा जवळकर ,वैशाली खाडेय, पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष माननीय शत्रुघ्न काटे, तसेच माजीनगरसेवक विजय (उर्फ शितल) शिंदे, राजू दुर्गे, गणेश लंगोटे, पंकज दलाल, संभाजी नाईकनवरे, राजेंद्र बाबर,  रघुनाथ जवळकर, राजेश पिल्ले, बापू घोलप, विनायक मोहिते, राजेश बाबर, अतुल इनामदार, अजित भालेराव, राहुल गावडे, योगेश बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल आयोजक श्रीमती अनुराधाताई गोरखे यांनी सर्व सहभागी महिलांचे, पाहुण्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे मन:पूर्वक आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!