धम्माल नगरी कार्यक्रमाचा अनेक बालकांनी घेतला आनंद
अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन वतीने बाल दिनानिमित्त धम्माल नगरी कार्यक्रम संपन्न
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे युवा नेते अनुप अविनाश मोरे यांच्या पुढाकाराने बाल दिनानिमित्त अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित धम्माल नगरी या कार्यक्रमाला लहान मुला मुलींचा अत्यंत उत्साहात व आनंदात प्रतिसाद पहावयास मिळाला.

बालदिनानिमित्त अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन प्राधिकरण आयोजित धमाल नगरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला लहान बालके व पालकांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला, यामध्ये जादूचे प्रयोग, विविध खेळ, पपेट शो आणि लहान बालकांसाठी खास खाद्य व्यवस्थेमुळे हा धम्माल नगरी उपक्रम चर्चेचा व लहान थोर सर्वांच्याच आनंदाचा विषय ठरला.

बाल दिनानिमित्त या धम्माल नगरी कार्यक्रमाचा अनेक लहान मुला मुलींनी आनंद घेतला तसेच पालकांनाही त्याचा आनंद अनुभवता आला. सदर उपक्रम हा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या माजी उपमहापौर शैलजा अविनाश मोरे व युवा नेते अनुप अविनाश मोरे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुला मुलींचे विशेष कौतुक केले.









