spot_img
spot_img
spot_img

सक्षमा प्रकल्पाच्या महिलांच्या हस्तनिर्मित वस्तूंना जागतिक कॉन्फरन्समध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘सक्षमा’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये बचत गटातील महिलांना शाश्वत रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकल्पांतर्गत नुकतेच एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये महिलांच्या हस्तनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फॅसिलिटेशन (आयएएफ) तर्फे लवळे येथील सांदिपणी होमेटेल येथे आयोजित कॉन्फरन्समध्ये सक्षमा प्रकल्पांतर्गत महिला बचत गटांद्वारे तयार केलेल्या घरगुती हस्तनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली होते. या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या देश-विदेशातील ९० पेक्षा जास्त कंपन्यांमधील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्वांकडून प्रदर्शनातील वारली नोटबुक, फाईल, पेन स्टँड, कँडल, सरस्वती फ्रेम्स, फ्रीज मॅग्नेट, कॉटन पाऊच आणि इंडियन गांधी खण टोपी अशा विविध वस्तूं खरेदी करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला.

हजारोंची विक्री

प्रदर्शनाच्या माध्यमातून एकूण २८ हजारांची विक्री करण्यात आली आहे. याशिवाय कॉन्फरन्सला उपस्थित असलेल्या कंपन्यांना वेलकम गिफ्ट म्हणून सक्षमा प्रकल्पातील महिलांनी तयार केलेल्या ७५ सरस्वती फ्रेम्स देण्यात आल्या आहेत. तसेच भविष्यात विविध कंपन्यांमध्ये सक्षमा प्रकल्पाद्वारे प्रदर्शन आयोजित करण्याबाबत सकारात्मक चर्चा यावेळी झाली. दुबई येथून कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी आलेले गुरविंदर सिंह यांनी वारली कॉम्बो डायरीची विशेष मागणी नोंदवली. हे प्रदर्शन भरवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे आयएएफच्या आयोजक वृंदा मनोरकर यांनी आभार मानले.

सक्षमा प्रकल्प महिलांना खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाकडे घेऊन जात आहे. जागतिक स्तरावरील कॉन्फरन्समध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाद्वारे महिलांना आर्थिक उत्पन्नासोबतच भविष्यातील विक्रीसाठी संधीचे दार खुले झाले आहे.
— ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!