शबनम न्यूज | प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय नेमबाज व सुवर्ण पदक विजेत्या सोनल बुंदेले यांनी आज आपला वाढदिवस सहारा वृध्दाश्रमातील आजी आजोबांबरोबर साजरा केला.
आंदर मावळातील कुसवली या आदिवासी गावात अनाथ निराधार आजी आजोबांसाठी सहारा वृध्दाश्रम आहे.
रस्त्यावर सापडलेल्या १४ आजी आजोबांचा येथे सांभाळ केला जातो.
नेमबाजी म्हणजेच धनुर्विद्या या कलेचा प्राचीन इतिहास ते आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाला आलेले महत्त्व याची माहिती सोनल बुंदेले यांनी आजी आजोबांना दिली. तसेच नेमबाजी कशी करायची असते,याची तयारी देखील त्यांनी करून घेत त्यांचे छान मनोरंजन केले. आश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी त्यांचे स्वागत करत
एक वेगळा वाढदिवस व अनोखा आनंद सर्वांनी मिळून यावेळी साजरा केला.








