शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेविका प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्या पुढाकाराने त्यांच्या स्त्रीरत्न फाउंडेशन व आदर्श शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक पाच मधील महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम संपन्न होत आहे.
सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता, आदर्श शिक्षण संस्थेच्या मैदानात संपन्न होत असून, प्रभाग क्रमांक पाच मधील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद लुटावा,विविध मनोरंजनात्मक खेळ खेळावे, आणि बक्षीसे जिंकावी असे आवाहन माजी नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांनी केले आहे.
प्रसिद्ध निवेदक अक्षय मोरे हे खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम सादर करणार असून या खेळामध्ये एकूण पाच राऊंड असतील प्रत्येक राऊंडमध्ये विजेत्या महिलांना प्रथम तीन क्रमांकांना कुकर, इस्तरी , मिक्सर अशी 15 बक्षिसे देण्यात येणार आहे. तर फायनल मधील प्रथम पाच क्रमांकांना पैठणी सोबतच फ्रिज, पिठाची गिरणी, टीव्ही , एक्वागार्ड ,कुलर,अशी किमतीवान बक्षीसे देण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर या
खेळ रंगला पैठणी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या प्रत्येक महिलेला सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे.
या खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमासोबतच दिवाळीमध्ये झालेल्या दीपोत्सव रांगोळी स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये हि प्रथम पाच क्रमांकांना यावेळी विविध बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम महिलांसाठी होणार असून या कार्यक्रमांमध्ये प्रभागातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन आनंद घ्यावा असे स्त्रीरत्न फाउंडेशन व आदर्श शिक्षण संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक पाच मधील जास्तीत जास्त महिला भगिनी यांनी या खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात सहभागी व्हावे तसेच खेळाचा आनंद लुटावा व बक्षीस जिंकावी असे आवाहन माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बारसे यांनी केले आहे








