शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले या जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांचे आरक्षण बदलल्याने अनेकांना धक्का बसला आहे.थेरगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 23 मधून वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस संभाजी बारणे हे निवडणूक लढण्यास तीव्र इच्छुक आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. थेरगाव परिसरात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. थेरगाव परिसरात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 23 व प्रभाग क्रमांक 24 हे दोन प्रभाग आहेत, संभाजी बारणे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश दिला तर आपण कोणत्याही प्रभागात कोठेही निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.
संभाजी बारणे यांनी 2012 व 2017 मध्ये निवडणूक लढविली होती, खूप कमी फरकाने त्यांचा विजय निसटला होता. परंतु यंदा थेरगाव मधील जनता आपल्याला नक्कीच साथ देईल असा आत्मविश्वास संभाजी बारणे यांना आहे.
संभाजी बारणे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक कार्य, राजकारण यासोबतच त्यांनी कला व सांस्कृतिक वारसा जपला आहे. ते उत्तम लेखक आहेत, ते उत्तम कवी आहेत, त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. थेरगाव चा इतिहास हे पुस्तक त्यांचे प्रामुख्याने खूप प्रसिद्ध झाले. एक अभ्यासू, संयमी व प्रशासनाची जाण असलेला जनसेवक , प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून ते ओळखले जातात. थेरगाव परिसरात विकासाच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा गावठाण मधील पुतळा त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नातून उभा राहिला. तसेच थेरगाव परिसरातील सुशोभीकरण त्यांच्याच प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच प्रभागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात. अनेकांना अडीअडचणीच्या काळात संभाजी बारणे यांची मदत मिळाली आहे. सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांचा एक अनोखा छंद त्यांनी जोपासला तो म्हणजे जुन्या पुरातन वस्तू संकलन करणे, यातूनच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगर सदस्यांचे विजिटिंग कार्ड त्यांनी संकलित केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून ते आत्तापर्यंत जे काही नगरसदस्य व लोकप्रतिनिधी पिंपरी चिंचवड शहरात होऊन गेले किंवा आहेत या सर्वांचे व्हिजिटिंग कार्ड संकलित केले त्यांच्या या कामाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली व संभाजी बारणे यांच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली . संपूर्ण देशात विजिटिंग कार्ड संकलित करणे ही संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणणे हे कार्य फक्त संभाजी बारणे यांच्याच नावाने कोरले गेले आहे. ही आपल्या पिंपरी चिंचवड करांसाठी अभिमानाची बाब ठरली.
आता आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजितदादा यांनी आदेश दिला तर आपण निवडणूक लढण्यास तयार आहोत आणि यंदा थेरगाव परिसरातील जनता नक्कीच माझ्यासोबत असेल असा त्यांचा ठाम आत्मविश्वास आहे. त्यानुसार त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने आपली तयारी सुरू केली आहे.
नुकताच राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकरणीमध्ये शहर सरचिटणीस पदी संभाजी बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाच्या वतीने अधिक बळ मिळाल्याने संभाजी बारणे यांचा आत्मविश्वास वाढला आहे.








