spot_img
spot_img
spot_img

पंडित नेहरू यांच्याशिवाय देशाचा इतिहास अपूर्ण – प्रा.परिमल माया सुधाकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारताला वगळून जगाचा इतिहास लिहिता येणार नाही हे पंडित नेहरू यांनी ‘ ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ’ पुस्तकात वेळोवेळी सांगितले. कारागृहात खडतर जीवन जगताना त्यांनी वाचन आणि लिखाण केले. भारताचे गत वैभव त्यांनी इंदिरा गांधी यांना विविध लिहिलेल्या पत्रातून चांगल्याप्रकारे मांडले आहे. देशाचा अभिमान बाळगण्यासाठी ज्या गोष्टी घडल्या त्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे ते सांगत. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना ज्याप्रमाणे अशोक, अकबर यांच्याशिवाय इतिहास लिहिता येणार नाही त्याप्रमाणे पंडित नेहरू यांच्याशिवाय देशाचा इतिहास लिखाण पूर्ण होऊ शकणार नाही असे मत एमआयटी स्कूल ऑफ गव्हरमेंटमधील सहयोगी प्राध्यापक परिमल माया सुधाकर यांनी व्यक्त केले.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पंडित नेहरूंनी स्वतंत्रलढ्यात तुरुंगवास भोगताना लिहिलेल्या ‘ ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ’ आणि ’द डिस्कवरी ऑफ इंडिया ’ या दोन पुस्तकांवर आधारित विशेष व्याख्याने  कोथरूड येथील गांधी भवन येथे पार पडले.तसेच
ज्येष्ठ लेखक प्रा. शंकर निकम यांनी लिहिलेल्या ‘गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. परिमल माया सुधाकर, प्रा.शंकर निकम,डॉ.शिवाजी कदम, ॲड.अभय छाजेड,डॉ.एम.एस.जाधव, अन्वर राजन उपस्थित होते.

प्रा. परिमल माया सुधाकर म्हणाले,ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ नेहरू यांनी १९३१ ते १९३४ यादरम्यानच्या काळात वयाच्या ४१ ते ४४ व्या वर्षी  लिहिला आहे. जगाचा इतिहास मध्ये ज्या सभ्यता ,संस्कृती या पाच हजार वर्षापूर्वी देशात निर्माण झाले त्यांचे स्थान नगण्य होते. त्यामुळे त्यांनी भारतीयांनी जगाचा इतिहास लिहिल्यावर का असेल हे लिखाणातून उलगडले आहे. तुरुंगात असताना त्यांची कन्या इंदिरा घरी होती, तिला पाहण्यासाठी घरी कोण नव्हते. त्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी आणि तिला जगाची माहिती होण्यासाठी जी पत्र त्यांनी तीन वर्षात १६० पेक्षा अधिक पत्र लिहिली त्याचे प्रारूप म्हणून ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीकडे पाहता येईल. देशात आणि परदेशात त्यांनी भेटी दिल्या होत्या त्यांचे इतिहासातील महत्व याच्या नोंदी त्यांनी पुस्तकात घेतल्याचे जाणवते. ऐतिहासिक वास्तू ज्या नजरेतून त्यांनी पहिल्या त्याचा उल्लेख देखील आढळतो. जगाचा इतिहासात निरंतर संस्कृती केवळ भारत आणि चीन मध्ये टिकुन राहिली त्याचा शोध घेण्याचा  प्रयत्न त्यांनी केला. विविध साम्राज्याचा उदय आणि अस्त याचा त्यांनी केवळ अभ्यास केला नाही तर धार्मिक प्रभाव याबाबत त्यांनी विश्लेषणात्मक लिखाण केले आहे.

 ‘द डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर बोलताना, दैनिक ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे म्हणाले, १९४६ साली हे पुस्तक पंडित नेहरू यांनी लिहिले आणि १९५० साली त्याचा अनुवाद साने गुरुजी यांनी केला. ज्या टप्प्यावर नेहरू यांनी पुस्तक लिखाण केले तो महत्वाचा आहे.पंडित नेहरू स्वातंत्र्यनंतर सुरवातीला १७ ते १८ वर्ष देश चालविण्यासाठी नसते तर भारताचे चित्र आज वेगळे दिसले असते. अनेक अडचणी असताना त्यांनी नवा भारत घडवला. भारत देशाला जोडणारा आणि बांधणारा कोणता धागा नसल्याने हा देश टिकू शकत नाही असे अनेकजण म्हणत होते. नेहरू यांची वैचारिक प्रगल्भता स्पष्ट असल्याने ते इतरांना स्वीकार्य होत नाही आणि त्यांच्यावर टीका केली जाते. भारत हा बहुआयामी आणि बहुसांस्कृतिक आहे हे नेहरू यांनी ओळखले होते. नेहरू यांची मांडणी ही आजचा देश कसा असावा याबाबत होती. प्राचीन भारत आणि आधुनिक भारत यांना जोडणारा दुवा महात्मा गांधी असल्याचे ते सांगत.दूरदृष्टी, विचारांची मांडणी आणि वैचारिक स्पष्टता हे नेहरूंचे गुण होते.लोकशाही मूल्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. भारताचा राष्ट्रवाद आपण निर्माण केलेला तो टिकवणे गरजेचे असल्याचे ते सांगत. निवडणुका या आदर्शवाद तत्वावर लढल्या पाहिजे असे त्यांचे मत होते. उद्याचा भारत हा पंडित नेहरू हे महात्मा गांधी यांना समजले होते.भारताचा इतिहास आणि गांधी विचार वेगळे करता येणार नाही. नवीन भारताचा शोध घेण्यासाठी आपल्याला आगामी काळात तसा विचार आणि कृती करावी लागेल.

लेखक प्रा.शंकर निकम म्हणाले, पंडित नेहरू यांचे विविध विषयावरील भूमिका आणि त्यांचे इतरांशी संबंध  “गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू”  पुस्तकातून उलगडून दाखवले आहे. पंडित नेहरू यांचे महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांचा सोबत असलेले संबंध कशाप्रकारे होते हे सांगण्यात आले. पंडित नेहरू यांनी स्ट्रॅटेजिक भूमिका मांडली नसती तर जम्मू काश्मीर हे भारतात कधी आले नसते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नेहरू यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

अन्वर राजन म्हणाले, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्याबाबत खोट्या गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहे. आधुनिक भारताची मूल्य ज्यांना मान्य नाही ते याप्रकारे नागरिकांची दिशाभूल करत आहे. आधुनिक विज्ञान दृष्टिकोन बाळगणे आजच्या काळात आवश्यक आहे.

आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू होते. महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे. भारताची जडणघडण कशी झाली हे नेहरू यांनी पुस्तकातून सांगितले आहे.असे अ भा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!