spot_img
spot_img
spot_img

आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अभिवादन…

पिंपरी, दि. १४ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त चिंचवड स्टेशन येथील लहूजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते तर पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत अभिवादन

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसदस्य मारुती भापकर,अनुराधा गोरखे, महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संजय ससाणे, नाना कांबळे, गणेश करवले, बाबासाहेब रसाळ, युवराज दाखले, नितीन घोलप, अनिल सौंदडे, हेमंत हरहरे, सूरज कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

चिंचवड स्टेशन येथील कार्यक्रम….

चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या तसेच क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी नगरसदस्य मारूती भापकर, सुनील कदम,माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब रसाळ, लहूजी वस्ताद साळवे जयंती समितीचे अध्यक्ष गणेश करवले, जेजुरी देवस्थान समितीचे विश्वस्त अनिल सौंदाडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे,संदीपान झोंबाडे, संजय ससाणे,अरूण जोगदंड, युवराज दाखले, सतीश भवाळ, नाना कसबे, सुरेश कांबळे, संजय धुतडमल, मनोज तोरडमल, सुनील भिसे, नितीन घोलप,नाना कांबळे, सविता आव्हाड,अविनाश शिंदे, राजू आवाळे,मयूर जाधव, शिवाजी साळवे,शंकर कावळे,बाळासाहेब खंदारे, बाळू कुचेकर, लहू अडसूळ, अनिल तांबे, , रवी पारधे,अनिल कांबळे, महादेव अढागळे, आनंद कांबळे, दादू भवर, नेताजी शिंदे, नाथा शिंदे, चंद्रकांत शिंदे, सुभाष लांडगे, रामा पवार, स्वप्नील मोहिते, विठ्ठल शिंदे, आकाश शिंदे, दीपक भंडारी, पांडुरंग पाटोळे, विलास लांडगे,मनीषा शिंदे, वैशाली जाधव, उषा कांबळे, राधिका अडागळे यांच्यासह जयंती उत्सव समितीचे सदस्य तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..

प्रबोधन पर्वात विविध कार्यक्रम

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यंदा दरवर्षीप्रमाणे क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंपाशेजारी जागेत केले होते. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते झाले. या प्रबोधन पर्वात शाहिर बापू पवार यांचा शाहिरी कार्यक्रम, निलेश देवकुळे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, लखन अडागळे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

आता पिंपरी चिंचवड शहरातील आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा उल्लेख गुगलवर…

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अनेक वर्षापूर्वी चिंचवड स्टेशनजवळ आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे स्मारक उभारण्यात आले आहे. परंतु गुगल लोकेशनवर या संबंधित माहिती उपलब्ध नव्हती, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे केली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून गुगल लोकेशनमध्ये या स्मारकाचा उल्लेख करून घेतला,यासाठी लहूजी वस्ताद साळवे जयंती उत्सव समितीच्या वतीने आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!