शबनम न्यूज | प्रतिनिधी
चऱ्होलीतील वडमुखवाडी येथे दोन मित्रांनी व्यावसायिकाच्या डोक्यात गोळी झाडून खून केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. आरोपींच्या शोधासाठी दिघी पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेची पाच पथके रवाना करण्यात आली असून, तपासाला वेग देण्यात आला आहे.
नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. चऱ्होली) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे तर अमित जीवन पठारे (वय ३५, रा. चऱ्होली) आणि विक्रांत ठाकूर (रा. खेड) अशी आरोपींची नावे आहेत.
मंगळवारी रात्री अलंकापुरम रस्त्यावरील शेड जवळ नितीन गिलबिले आणि काहीजण थांबले असताना आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे फॉर्च्यूनर कार घेऊन तेथे आले, त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत नितीन यांचा मृत्यू झाला. तर आरोपी दोघेही कार सह पसार झाले, यानंतर या घटनेला २४ तास उलटूनही आरोपी अद्यापही फरार आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले की, आरोपींच्या मागावर दिघी पोलीस आणि गुन्हे शाखेची संयुक्तपणे पाच पदके कार्यरत असून, आरोपी लवकरच ताब्यात असतील.








