spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत शनिवारी शिवसेनेचा मेळावा

शबनम न्यूज | प्रतिनिधी
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेनेचा शनिवारी (१५ नोव्हेंबर) पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
पिंपरीतील कृष्णा हॉटेल येथे शनिवारी दिवसभर पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता हा मेळावा सुरू होणार असून दुपारी चार वाजेपर्यंत चालणार आहे. खासदार श्रीरंग बारणे हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत.  संघटन कौशल्य व निवडणूक यंत्रणेबाबत शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे प्रमुख सुधीर जोशी मतदार यादीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर, प्रसिद्ध व्याख्याते ज्ञानेश्वर कवडे हे भाषण कौशल्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. शिवसेनेने घरोघरी जाऊन सभासद नोंदणी केली आहे. सभासद नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेबाबत सकारात्मक वातावरण आहे. या मेळाव्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर प्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख निलेश तरस, महिला संघटिका सरिता साने यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!