विकास कामांच्या जोरावर व मतदारांच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडती मध्ये आपल्या गटातून इतर आरक्षण पडल्यामुळे अनेक माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य अडचणीत आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण 128 जागांपैकी 92 जागांवर आरक्षण पडले, त्यात एकूण 78 माजी नगरसेवकांच्या जागा सुरक्षित राहिल्या आहे, तर 47 माजी नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. अशातच प्रभाग क्रमांक पाच मधून माजी नगरसेविका प्रियांका ताई प्रवीण बारसे यांची जागा सुरक्षित राहिली आहे. आरक्षण जाहीर होताच जागा सुरक्षित राहिल्याने प्रियांकाताई प्रवीण बारसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच समर्थकांमध्ये व मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
माजी नगरसेविका प्रियांका ताई प्रवीण बारसे यामागील 2012 पासून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून मतदारांनी प्रियांका ताई प्रवीण बारसे यांना महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. यानंतर त्यांनी आपल्या प्रभागात विकास कामांचा धडाका सुरू केला, या विकास कामांच्या जोरावर प्रियांकाताई प्रवीण बारसे या सक्षम नेतृत्व म्हणून नावारूपास आल्या, मतदारांचा विश्वास, अथक मेहनत व परिश्रम करण्याची मानसिकता, विकास कामांचा ध्यास, शैक्षणिक क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून ची उल्लेखनीय कामगिरी, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्परता, या सर्व गुणांमुळे प्रियांका ताई बारसे या प्रभागातील सर्व वयोगटातील मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत. मागील नऊ वर्षापासून मतदारांनी दाखविलेला विश्वास प्रियांकाताई बारसे यांनी सार्थ ठरविला आहे.
प्रशासकीय काळातही प्रभागाच्या विकासासाठी प्रियांका ताई बारसे यांनी उल्लेखनीय कामे केली आहेत. आगामी येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधील मतदारांनी प्रियांकाताई प्रवीण बारसे यांनाच नेतृत्व करण्याची संधी देण्याचे ठरविले असल्याचे सांगितले जाते.
प्रभाग क्रमांक पाच मध्ये अ) महिला ओबीसी, ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव असे आरक्षण पडले आहे.
यामध्ये प्रियांका प्रवीण बारसे यांना सर्वसाधारण महिला करिता जागा आरक्षित झाली आहे. प्रियांका ताई प्रवीण बारसे निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. माझ्या प्रभागातील मतदार हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, प्रभागाच्या विकासाकरिता आपण नेहमी कटिबद्ध आहोत, असे प्रियांका ताई बारसे नेहमीच सांगत असतात. त्यांचा अभ्यासू, प्रशासकीय कामातील अनुभव, प्रशासनावर पकड व प्रेमळ, संयमी स्वभाव असल्याने अनेक मतदार हे प्रियांका ताई प्रवीण बारसे यांनाच आगामी महानगरपालिका निवडणुकीत निवडून देतील, अशी सध्याची प्रभागातील परिस्थिती आहे. प्रभागातून विरोधी पक्षातील कोणता उमेदवार प्रियांका प्रवीण बारसे यांच्या विरोधात असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. परंतु विरोधात कोणीही असो आपणास फरक पडत नाही मी माझ्या कामाच्या जोरावर व मतदारांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक नक्कीच जिंकेल असा आत्मविश्वास प्रियांका ताई प्रवीण बारसे यांनी व्यक्त केला आहे.









