spot_img
spot_img
spot_img

उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे अग्निशमन विभागाचा अतिरिक्त पदभार

सिताराम बहुरे यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे अग्निशमन विभागाचा तर उपायुक्त सिताराम बहुरे यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागाचा अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडे स्थापत्य मुख्य कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

महापालिकेमध्ये अग्निशमन विभागाचा कार्यभार सांभाळणारे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांची बदली झाली आहे. यामुळे रिक्त झालेल्या अग्निशमन विभागाचा अतिरिक्त कार्यभार पशुवैद्यकीय कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे (पशुवैद्यकीय कामगार कल्याण विभागासह) सोपविण्यात आला आहे.

तर मध्यवर्ती भांडार विभागाचा कार्यभार पाहणारे उपायुक्त निलेश भदाने यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आली असून त्यांची पुन्हा त्यांच्या मूळ विभागात बदली झाली आहे. यामुळे रिक्त झालेल्या मध्यवर्ती भांडार विभागाचा अतिरिक्त कार्यभार भूमि आणि जिंदगी विभागाचे उपायुक्त सिताराम बहुरे यांच्याकडे (भूमि आणि जिंदगी विभागासह) सोपविण्यात आला आहे.

तसेच महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील स्थापत्य विभागात सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार हे ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे रिक्त झालेल्या स्थापत्य विभागाचा अतिरिक्त कार्यभार पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडे यांच्याकडे (पाणी पुरवठा विभागासह) सोपविण्यात आला आहे.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!