शबनम न्यूज | प्रतिनिधी
चॅम्पियन अरेना शूटिंग अकॅडमी, भोसरी येथील नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ३४ वी अखिल भारतीय जी. व्ही. मावलंकर प्री-नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप (पिस्तूल) – २०२५, अहमदाबाद, गुजरात येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
प्रशिक्षक ओम शंकर पोखरकर (१० मी. व २५ मी. शूटिंग कोच) यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीतील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू :
- स्वर संगम कुमावत – ३५९/४००
- सोहम बाबासाहेब गंजे – ३५७/४००
- सामर्थ शेलार – ३५२/४००
- हर्षवर्धन टिकायत – ३४४/४००
- प्रियांका भास्कर गारजे – ३३५/४००
तसेच विवान तानपुरे, सैश वाघ, स्वरूप शेलार आणि वेदश्री यांनीही त्यांच्या गटात उत्तम गुण मिळवले आहेत.
प्रशिक्षक ओम शंकर पोखरकर यांनी सांगितले की फक्त सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हे विद्यार्थी — ज्यांनी अगदी शून्यापासून सुरुवात केली — राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत.
ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह अकॅडमीतील दर्जेदार प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचे फलित आहे.
चॅम्पियन अरेना शूटिंग क्लब सतत पुण्यातील तरुणांना नेमबाजीच्या क्रीडाक्षेत्रात नव्या उंचीवर नेण्याचे प्रेरणादायी कार्य करत आहे.
“विद्यार्थ्यांची सातत्य, शिस्त आणि अथक परिश्रम यामुळेच हे यश मिळाले आहे. मला खात्री आहे की हे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करतील,” असे प्रशिक्षक पोखरकर यांनी सांगितले.








