शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण काल जाहीर झाले. या आरक्षणामध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांच्या जागेचे आरक्षण बदलल्याने अनेकांना धक्का बसलाय. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका मनिषा प्रमोद पवार यांचे आरक्षण जैसे थे राहिल्याने मनीषा पवार यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
काल आरक्षण जाहीर होताच मनिषा प्रमोद पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जल्लोष करण्यात आला.
मागील नऊ वर्षापासून मनिषा प्रमोद पवार या सातत्याने आपल्या प्रभागात काम करीत आहेत. 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 23 मधील मतदारांनी मनिषा प्रमोद पवार यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले, त्यानंतर मनिषा पवार यांनी प्रभागात विकासाच्या कामाचा धडाका सुरू केला. विकास कामे करताना संपूर्ण प्रभागात मतदारांशी आपुलकीचे नाते मनिषा पवार यांनी निर्माण केले. यंदाही मनिषा पवार यांनाच प्रभाग क्रमांक 23 चे नेतृत्व करण्याची संधी देण्याचे मतदारांनी ठरविले आहे.
प्रभाग क्रमांक 23 मध्ये अ) महिला अनुसूचित जाती,ब) ओबीसी, क) महिला सर्वसाधारण, ड) अ राखीव
असे आरक्षण पडले आहे. यामध्ये मनिषा प्रमोद पवार यांना महिला अनुसूचित जाती करिता जागा आरक्षित झाली, आता मनिषा प्रमोद पवार यांना निवडणूक सोपी झाली असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनही मनिषा पवार यांना उमेदवारीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मधून परत एकदा मनिषा प्रमोद पवार याच आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतील यात शंका नाही.








