शबनम न्यूज | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे बहिःशाल शिक्षण मंडळ व जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष आणि कमला शिक्षण संस्थेचे प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चिंचवड- पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला” घेण्यात आली. कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ.दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली.
पहिले पुष्प प्रमुख वक्ते डॉ.रुस्तुम दराडे यांनी ‘मुलाखत तंत्र’ याविषयी माहिती दिली. त्यात त्यांनी मुलाखतीसाठी कशी तयारी करावी? तसेच विविध तंत्रांचा प्रभावीपणे वापर कसा करावा याविषयी योग्य मार्गदर्शन केले. अशाप्रकारे पहिल्या पुष्पाची सांगता झाली.
दुसऱ्या पुष्पाचे प्रमुख वक्ते मुबीन तांबोळी यांची ‘हास्यहंडी धमाल’ हा एकपात्री प्रयोग बी.एड.च्या सूक्ष्म अध्यापनापासून ते सराव पाठापर्यंत विद्यार्थ्यांची कशी धांदल उडालेली असते याविषयी एक पात्री प्रयोग होता. तसेच त्यांनी इतरांशी तुलना न करता, स्वतःला ओळखून दुसऱ्यासाठी प्रेरणा म्हणून जगा असा संदेश दिला.
तिसऱ्या पुष्पाचे प्रमुख वक्ते डॉ. भिसे धनाजी यांनी ‘भारतीय ज्ञान परंपरा काळाची गरज’ याविषयी उत्तम उदाहरणांसह गरज स्पष्ट केली. प्राचीन मानव ते आताचा मानव यात कसा बदल झालेला आहे हे त्यांनी तिसरे पुष्पात गुंफले. सदर व्याख्यानमालेचे प्रास्ताविक कार्य केंद्रवाहक प्रा.सुशील भोंग यांनी केले. तर सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्गानी सक्रिय सहभाग घेतला.








